तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत बाळूमामा यांच्या 134 व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
खंडोबा मंदिर, तेर (पेठ) येथे मोठ्या भक्तिभावाने जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्रींच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.दुपारी ठीक 3 वाजून 23 मिनिटांनी श्रींच्या पालखीवर फुले आणि भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.यानंतर महीलानी पाळणे गायले व पालखी मिरवणूक काढण्यात आली.सायंकाळी श्रींची महाआरती करण्यात आली.यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.सायंकाळी बालकीर्तनकार ह. भ. प. प्रणव महाराज तोर( टाकळीकर )यांच्या कीर्तनाने भक्तिमय सोहळा संपन्न झाला.यावेळी तेर व परिसरातील भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
