तुळजापूर (प्रतिनिधी)- भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची ओटी भरून आरती करत देवींचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन सपत्नीक सत्कार केला. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश अभिश्री डी. देव, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, पोलिस निरीक्षक बालाजी येवते, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, रामेश्वर वाले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, अभिजीत तेरखेडकर यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
