धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर येथे युवकाच्या हत्या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेवून मागणी केली आहे. 

काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजातील दोन युवकांना बेदम मारहाण करण्यात आली होती. यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला होता. तर एक गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. या संदर्भात आवाज उठविण्यासाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील मंगळवार दि. 17 नोव्हेंबर रोजी धाराशिव येथे आले होते. या भेटी त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची भेट घेवून या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा अशी जोरदार मागणी केली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या काही महिन्यापासून तुळजापूरमध्ये प्रचंड गुंडगिरी वाढली असून, या गुंडगिरीला प्रतिबंध पोलिस का करू शकत नाहीत अशा प्रश्न उपस्थित करून गुंडगिरीला प्रतिबंध केला असता तर समीर पटेल यांची हत्या झाली नसती. समीर पटेल यांच्या हत्येतील सर्व आरोपींना का अटक केली जात नाही. व्हिडीओ पाहून पोलिस विभाग सोमोटो एफआयआर का दाखल करत नाहीत. या संदर्भात पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना आपण निवेदनही दिले असल्याचे सांगितले. जलील यांनी सांगितले की, विशेष म्हणजे समीर पटेल यांची कट रचून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात जे कलम व सेक्सन लावणे आवश्यक होते ते लावले गेले नाहीत. या प्रकरणी न्याय नाही मिळल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेमध्ये दिला. यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शहाबाज काझी उपस्थित होते. 


 
Top