धाराशिव (प्रतिनिधी)- महिला बी.एड. महाविद्यालय, तासगावचे प्राचार्य तथा धाराशिव येथे राहत असलेले डॉ. रत्नाकर म्हस्के यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर मूळगावी राहुलनगर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने विद्यार्थी, सहकारी आणि मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
