धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुरेखा कांबळे यांनी केले. शिंगोली आश्रमशाळेत आयोजित संविधान दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. पर्यवेक्षक रत्नाकर पाटील यांनी प्रास्ताविकात स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांवर आधारित संविधाननिर्मितीतील बाबासाहेबांचे योगदान सांगितले. प्रमुख पाहुण्या बालिका बोयणे यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय शैक्षणिक प्रवासातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. प्रभारी मुख्याध्यापक सतीश कुंभार यांनी बाबासाहेबांच्या अभ्यासू वृत्तीचा व सामाजिक विचारांचा आढावा घेतला.

यावेळी पडवळ खंडू, शानिमे  कैलास, क्रिडा शिक्षक सुधीर कांबळे, वरीष्ठ लिपिक मस्के संजयकुमार ,राठोड  प्रशांत, कोणदे  मल्लिनाथ, इरफान शेख, विशाल राठोड,सचिन राठोड,श्रीमती  सूर्यवंशी, ज्योती साने, ज्योती राठोड, कर्मचारी गोविंद बनसोडे, वसंत भिसे, रेवा चव्हाण, अविनाश घोडके, सागर सुर्यवंशी, अमोल जगताप व  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top