धाराशिव (प्रतिनिधी)- भारताच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज धाराशिव जिल्हा काँग्रेस भवन येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी कणखर नेतृत्व, धाडसी निर्णयक्षमता आणि खंबीर इच्छाशक्तीच्या बळावर जागतिक स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण केली. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान, त्यांचे विचार आणि नेतृत्व आजही देशवासीयांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

या अभिवादन कार्यक्रमास धनंजय राऊत, प्रशांत पाटील, खलील सय्यद, ॲड. जावेद काझी, अभिमान पेठे, अंकुश पेठे, प्रभाकर लोंढे, जयसिंग पवार, ज्योतीराम निमसे, ॲड. गणपत कांबळे, हरिदास शिंदे, ॲड. राजूदास आडे, अविनाश रणखांब, संजय गजधने, बाबा मोमीन, मोइब शेख, दयानंद नागापुरे, विश्वजीत बनसोडे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top