धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेला सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि सातत्यपूर्ण व्यवसाय वृद्धीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‌‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोध' पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित  ‌‘इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्डस' 2026 या राष्ट्रीय सोहळ्यात संस्थेला हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला.

या गौरवशाली सोहळ्यात संस्थेच्या वतीने मुख्याधिकारी राजेश जाधव आणि सहमुख्याधिकारी श्री. अरविंद गोरे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष  विद्याधर अनासकर तसेच केंद्रीय सहकार विभागातील मान्यवर उपस्थित होते. संस्थेने सभासदांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार, आर्थिक शिस्त, उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि प्रभावी व्यवस्थापन यांच्या बळावर सातत्याने प्रगती साधली आहे. संस्थेच्या व्यवसाय वृद्धीची आणि सहकार क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे हा संस्थेसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.

या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त करत संस्थेशी जोडलेल्या सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा पुरस्कार संस्थेवर सर्वांनी दाखविलेल्या विश्वासाचा आणि एकत्रित प्रयत्नांचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान संस्थेच्या प्रगतीला नवी प्रेरणा देणारा असून, भविष्यातही सहकाराच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी, विश्वासार्ह सेवा आणि समाजाभिमुख कार्य करण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटच्या या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचा लौकिक देशभरात उंचावला असून, संस्थेच्या यशस्वी वाटचालीत आजचा दिवस एक मानाचा आणि ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. विश्वास, सेवा आणि समृद्धीच्या दिशेने श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटची यशस्वी वाटचाल सुरूच

 
Top