तुळजापूर (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक के. पद्मजा यांनी मंगळवारी (दि. १७) तुळजापूर येथे येऊन तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देशवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
दर्शनानंतर पुजारी नगर फाउंडेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पुजारी यांच्या हस्ते देवीची प्रतिमा, कवड्याची माळ आणि कुंकू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, विभागीय परिचलन व्यवस्थापक नरेंद्र वर्मा, लातूरचे रेल्वे स्थानक प्रबंधक संजय अर्धापुरे, फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, सामाजिक कार्यकर्ते बापू जगदे, तालुकाध्यक्ष राहुल जाधव आदी उपस्थित होते.
