धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील रहिवाशी व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील सेवानिवृत्त लिपीक रत्नाकर हरिश्चंद्र सिनगारे (वय 74) यांचे सोमवार, 16 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी खामगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सेवनिवृत्त संचालक प्रवीण सिनगारे यांचे ते बंधू आणि सामाजिक कार्यकर्ते मनोगत सिनगारे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, भाऊ, बहिणी, असा परिवार आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
