धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. के. मंजुळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ मंजुळकर म्हणाले की,आज सामाजिक सलोख्याची नितांत आवश्यकता आहे,धर्म,जात, असे सर्व भेद विसरून अहिंसक मार्गाने समाजात प्रत्येक माणूस जगला पाहिजे, देशाला सकारात्मक विचारांच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचे काम आजच्या तरुणांचे आहे असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.सदर प्रसंगी प्रा विवेकानंद चव्हाण, सुभाष इंगळे, गोवर्धन भोंडे, सहायक ग्रंथपाल मोईन पाटील यांच्या सह सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
