तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा उपाध्यक्ष तानाजी कदम 60 यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथील खाजगी रुग्णालयात शनिवार दि. 21 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता दुखद  निधन  झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, पत्नी, तीन भाऊ बहीणी, नातवडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर रविवार दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता मोती झरा स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रिपाई पक्षाचे राज्य स्तरीय पदाधिकारी, नगराध्यक्षा सह विविध पक्षांचे पदाधिकारी, नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

 
Top