तेर(प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे धनत्रयोदशी निमित्ताने धन्वंतरीचे पूजन करण्यात आले.
दिवाळी सणाच्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस धनत्रयोदशी आहे. हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जात. या दिवशी चांगल्या आरोग्यासाठी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते. तेर येथेही धनत्रयोदशी निमित्ताने धन्वंतरीचे पूजन डॉ .अक्षय शिराळ व डॉ.श्रेया शिराळ यांनी पूजन केले.
