तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथे येथे आर्ट ऑफ लिविंग परिवार तेर यांच्या वतीने आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले होते.
शिबिरासाठी आर्ट ऑफ लिविंगचे शिक्षक मनीष भोसले, विजयसिंह फंड यांनी प्रशिक्षण दिले. या शिबिरामध्ये पंडित आंधळे, तनुजा साळुंके, आकांक्षा दीक्षित, मनीषा पंडित, दत्ता पंडित, जितेंद्र दीक्षित, देवराज पांचाळ, नवनाथ पसारे,काका नाईकवाडी, प्रणव कोकरे,प्रणाली कोकरे, बबन कोकरे, प्राची पंडित , निर्मला इंगळे, जना माळी,शितलसिंह चव्हाण, सागर भक्ते,लक्ष्मी बनसोडे,सिंधू बनसोडे, श्रुती शिराळ, सुखदेव पेठे इत्यादी प्रशिक्षणात सहभागी झाले होते.आनंद अनुभूती शिबिर यशस्वी करण्यासाठी बालाजी भक्ते, नारायण साळुंके ,ओम नाईकवाडी, सुनिता पांचाळ आणि नवनाथ पांचाळ या साधकांनी परीश्रम घेतले.
