धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलने राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सालाबादाप्रमाणे याही वर्षी घवघवीत यश संपादन करीत प्रशालेतील यशात मानाचा शिरपेच रोवला आहे.
जालना येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत प्रशालेतील 14 वर्ष वयोगटात इयत्ता 8 वीत शिकणारा विराज पाटील तसेच गुरूवर्य के.टी. पाटील फाउंडेशन क्लास इयत्ता 7 वीचा विद्यार्थी अर्णव मनोज माने यांनी प्रतिस्पर्धेला आपल्या चपळाईच्या असिम ताकतीवर पराभूत करून या दोन्ही खेळाडूनी ब्राँझ पदक पटकावले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, संस्था सचिव प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, गुरूवर्य के. टी. पाटील फाउंडेशन क्लासचे प्रमुख शरद क्षीरसागर, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक केशव पाटील, बी. बी. गुंड, कुमार निकम, बालाजी गोरे, राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते प्रविण बागल व क्रीडा विभाग प्रमुख अभिजीत पाटील यांनी या दोन्ही खेळाडूंचे व त्यांचे मार्गदर्शक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
