धाराशिव (प्रतिनिधी)- मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त शहरातुन भव्य दिव्य अशी संविधान जनजागरण रॅली काढण्यात आली होती, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रॅलीचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांना व्यापारी महासंघ, राजर्षी शाहू सामाजिक संस्था व प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने बिस्किटे, लाडु,केळी व पाणी वाटप करण्यात आले, व्यापारी महासंघाचे लक्ष्मीकांत जाधव,संजय मंत्री,राजर्षी शाहू सामाजिक संस्थेचे उज्ज्वला शिंदे,ज्योती राजेनिंबाळकर, रमेश पाटील,तर प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेचे किरणताई निंबाळकर,रेणुका माने सह इतर उपस्थित होते, मतदार जनजागरण समितीच्या वतीने एम डी देशमुख,अब्दुल लतीफ,गणेश वाघमारे यांच्या हस्ते त्यांचे संविधान उद्देशिका विश्लेषण प्रत दिली तर संजय गजधने,अमर आगळे यांनी आभार मानले.

 
Top