धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या सन 2026-27 या वर्षाकरिता महिला आघाडी कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. यामध्ये महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सौ रेखाताई लोमटे यांची समितीच्या वतीने निवड करण्यात आली. महिला आघाडी कार्यकारिणी उपाध्यक्षपदी सौ शैलाताई दसपुते तर सचिव पदी सौ मोनिकाताई भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून सौ श्वेताताई दुरगकर , संघटक सौ ज्योतीताई सपाटे, प्रवक्ता सौ पूजाताई पाटील, कोषाध्यक्ष सौ प्रतीक्षाताई शिंदे, प्रसिद्धीप्रमुख सौ रेणुकाताई शिंदे तर सोशल मीडिया प्रमुख म्हणून कृतिकाताई दसपुते यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. या सर्व निवडी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे विद्यमान अध्यक्ष श्री गुंडोपंत जोशी यांनी जाहीर केल्या. यावेळी समितीचे जेष्ठ मार्गदर्शक श्री शशिकांत खुणे, ऍड श्री संजय शिंदे, श्री धनंजय साळुंके, श्री दत्ता साळुंके, श्री हनुमंत तांबे, श्री विष्णू इंगळे, श्री ओंकार नायगावकर, श्री अभिजीत निंबाळकर, श्री कंचेश्वर डोंगरे यांचे सह समितीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top