तुळजापूर (प्रतिनिधी)- हिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण असलेल्या दीपा .ली पर्वाला यंदा 5 नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे.

आगे ची ज्वाला खांद्यावर वाहून नेला जाणारा भेंडोळी उत्सव रविवार दि 8 रोजी सायंकाळी संपन्न होणार आहे.

शुक्रवार, 6 नोव्हेंबर  धनत्रयोदशी व धन्वंतरी जयंती, धनत्रयोदशी पूजनाचा शुभ मुहूर्त : सायंकाळी 6.30 ते रात्री 8.30. रविवार, 8 नोव्हेंबर  नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन, रविवार, 8 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी, अश्विनी आमवस्या सकाळी 11 वाजता प्रारंभ होणार असल्याने रात्री भेंडोळी उत्सव व खजिना पूजन, मंगळवार, 10 नोव्हेंबर  बलिप्रतिपदा व दीपावली पाडवा. मंगळवार, 10 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा अर्थात दीपावली पाडवा साजरा होणार आहे. या दिवशी अभ्यंगस्नान, वहिपूजन, व्यापारी वर्गासाठी हा दिवस नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ मानला जातो. नवीन हिशेबवह्यांचे पूजन करून व्यावसायिक व्यवहारांना सुरुवात केली जाते.

बुधवार, 11 नोव्हेंबर  भाऊबीज, दीपावली पर्वाची सांगता बुधवार, 11 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेने होणार आहे. या दिवशी बहिणीने भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करावी. भाऊ-बहीण यांच्या प्रेमाचे आणि अतूट नात्याचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर राजे शहाजी महाद्वार द्वारे आकाश कंदील लावण्यात आला आहे या आकाश कंदीला वर तसेच श्री तुळजाभवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो लावले आहेत.

 
Top