तेर (प्रतिनिधी)- तेर येथील शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मगर यांच्या वतीने स्पेलिंग बी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
इयत्ता दुसरी जिल्ह्यात तृतीय क्रमांकस्वराज विजय वाघशाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिकशाळा स्पेशल तेर,इयत्ता तिसरी जिल्ह्यात दुसरा क्रमांक स्वरा जगदीश सावतर शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाणवाडी, इयत्ता चौथी जिल्ह्यात दुसरा क्रमांक राजलक्ष्मी युवराज घेवारे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणेवाडी, इयत्ता पाचवी जिल्ह्यात प्रथम क्रमांक अभिनव अंकुश निकम शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला, इयत्ता सहावी जिल्ह्यात तृतीय क्रमांक आराध्या युवराज नेपते शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला, इयत्ता सातवी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक फरहान दिलदार पटेल शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला, इयत्ता आठवी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक निकीता नामदेव पवार शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरणी या विजेत्यांना राजेंद्र मगर विस्तार अधिकारी बिट तेर यांच्या तर्फे प्रत्येक वर्गातून पहिला क्रमांक 1001,दुसरा क्रमांक 701,तिसरा क्रमांक 501रुपये रोख बक्षीस स्वखर्चाने देऊन गुलाब पुष्प व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख राहुल शेळके ,विषय तज्ञ सुनीता वाकुरे उपस्थित होते.बिट स्तरीय शिक्षण परिषद मध्ये बक्षीस वितरण करण्यात आले.
