तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तुळजापूर येथे आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी शिरूर (पुणे) येथील भाविक अलका राक्षे यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी 989 ग्रॅम वजनाची चांदीची समई देवीजींच्या चरणी अर्पण केली.

सदर चांदीच्या समईची धार्मिक कार्यालयात अधिकृत नोंद करून ती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे जमा करण्यात आली. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांनी देणगीदार भाविक यांचा सत्कार केला. याप्रसंगी पुजारी नंदू गंगणे यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी व पुजारी बांधव उपस्थित होते.

 
Top