धाराशिव (प्रतिनिधी)-  अपुर्णांकाच्या गणनेबाबत राज्य शासनाकडून स्पष्ट निर्देश आल्याने धाराशिव जिल्हा परिषदमध्ये आता पाच ऐवजी 6 स्वीकृत सदस्यांची निवडले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या 55 वरून 61 होणार आहे. 

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात 3 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत निवडीची प्रक्रिया आणि पक्षनिहाय जागा वाटप निश्चित होणार आहेत. नामनिर्देशित सदस्यांची संख्या निश्चित करताना अपुर्णांकाच्या गणनेबाबत शासनाने मार्गदर्शन जारी केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या एकूण सदस्यांच्या 10 टक्के किंवा किमान पाच सदस्य यापैकी अधिक संख्या नामनिर्देशित केली जाणार आहे. पंचायत समितीत एकूण सदस्यांच्या 20 टक्के किंवा किमान एक सदस्य, यापैकी अधिक संख्या अपुर्णांक दुर्लक्षित करावा. तर अर्धा किंवा त्यापेक्षा अधिक अपुर्णांक एक म्हणून मोजावा असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेतमध्ये 5 ऐवजी 6 सदस्य निवडले जातील. तर आठ पंचायत समित्यांमध्ये 22 सदस्य निवडले जातील. विशेष म्हणजे स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गट म्हणून नोंदणी प्रक्रिया अगोदरच पार पडली आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षाने गट म्हणून स्वतंत्र नोंदणी केली आहे. तर महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून देखील स्वतंत्र नोंदणी केली आहे. 

 
Top