तेर (प्रतिनिधी)-  सामाजिक एकतेसाठी 'संत विचारांची शिदोरी 'घेऊन निघणाऱ्या चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची असे प्रतिपादन समता वारीचे निमंत्रक सचिन पाटील यांनी  दिली.   

संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘चोखोबा ते तुकोबा' या समता वारीचे प्रतीवर्षीप्रमाणे आयोजन करण्यात येते. वारीचा प्रारंभ बुधवार, दि. 1 जानेवारी 2027 ते 12 जानेवारी दरम्यान श्री संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथून करण्यात येणार आहे. भागवत धर्म - वारकरी संतांनी सांगितलेल्या समता, मानवता आणि बंधूभाव या मूल्यांचा जागर हा समता वारी आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. 

‌‘चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची 2027 'चे यंदाचे 9 वे वर्ष आहे. ही वारी महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, उमरगा, माकणी, औसा  तुळजापूर, धाराशिव, तेर, कसबे तडवळे, येरमाळा, भूम-पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथगड, पाथर्डी, पैठण, जालना, सिंदखेडराजा, मेहुणाराजा, देउळगांवराजा, संभाजीनगर, नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर, कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, वाघोली, पुणे, आळंदी या मार्गे येऊन देहूगाव येथे जाणार आहे. वारी राज्यातील 9  जिल्ह्यातून 1750  किलोमीटर प्रवास करणार आहे. 

एकसंघ समाज हे राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य अधिष्ठान आहे. जात, पंथ, धर्म, प्रांत या पलीकडे जाऊन आपण सर्वजण भारतीय एक आहोत हा विचार घेऊन सामाजिक एकतेसाठी चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची चे आयोजन यावर्षी देखील करण्यात आले आहे अशी माहिती समता वारीचे  निमंत्रक सचिन पाटील यांनी दिली.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top