धाराशिव (प्रतिनिधी)- परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे उद्या,मंगळवार,दि.3 नोव्हेंबर 2026 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते धाराशिव,पळसप,येरमाळा आणि पारगाव येथे आयोजित दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्री सरनाईक हे मंगळवारी सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथून मोटारीने धाराशिवकडे प्रयाण करतील.सकाळी 10 वाजता धाराशिव येथे त्यांचे आगमन होईल.त्यानंतर ते दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी 10.30 वाजता धाराशिव येथून मोटारीने पळसप (ता.धाराशिव) येथे प्रयाण करतील.सकाळी 11.15 वाजता पळसप येथे त्यांचे आगमन,याठिकाणी आयोजित दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.सकाळी 11.45 वाजता पळसप येथून मोटारीने येरमाळा (ता.कळंब) येथे प्रयाण करतील. दुपारी 12.30 वाजता येरमाळा येथे त्यांचे आगमन व याठिकाणी आयोजित दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता येरमाळा येथून मोटारीने पारगाव (ता.वाशी,जि.धाराशिव) येथे प्रयाण करतील.दुपारी 1.30 वाजता पारगाव येथे त्यांचे आगमन होईल. याठिकाणीही ते दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमास उपस्थित राहतील.दुपारी 2 वाजता पारगाव येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
