धाराशिव (प्रतिनिधी)- येडशी येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर आपत्तीग्रस्त कृष्णा गोविंद करंडे यांना आधार देण्यासाठी शिवसेना आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ पुढे सरसावले आहे. आज दि. 24 नोव्हेंबर 2026 शिवसेनेच्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शुभहस्ते करंडे यांना 1 लाख रुपयांचा धनादेश 'फूल ना फुलाची पाकळी' या भावनेतून सुपूर्द करण्यात आला.

ही आर्थिक मदत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या पुढाकारातून देण्यात आली आहे. संकटाच्या काळात समाजातील घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सामाजिक बांधिलकीतून हा मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. याप्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मदतीबद्दल कृष्णा करंडे व त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 


 
Top