धाराशिव (प्रतिनिधी)- दुष्काळी स्थितीमुळे खरीप पीके पावसा अभावी गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यातच आहे तेवढ्या पाण्यावर पोसलेला ऊस पाण्याअभावी वाळत आहे. ऊस तोड येईपर्यंत जोपाासलेला ऊस वादळी वाऱ्यामुळे शॉटसर्किट होऊन ऊस, ठिकब सिंचन व शेती साहित्य जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झालेले आहे. कळंब तालुक्यातील सौंदण अंबा येथील पंधरा शेतकऱ्यांचा 25 एकर ऊस तसेच दाभा, करंजकल्ला, लोहटा पूर्व, पाडोळी धाराशिव तालुक्यातील जुनोनी तसेच जिल्ह्यातील इतर गावांमधये गेल्या दहा दिवसामध्ये शंभर एकरच्या पुढे ऊस जळाला असून त्याचे महावितरण कपंनीने अद्याप पंचनामे देखील केलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदील झालेला असून आपला ऊस कारखान्याला घालविण्याचा प्रयत्न करत असताना साखर कारखाने जळालेल्या ऊसामधून 25 ते 35 टक्के ऊस वजन कपात धरत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

या संकटग्रस्त शेतकऱ्यांना महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासंदर्भात व कारखान्यांने जळालेल्या ऊसाच्या वजनाची कपात करुन नये या साठी संबंधीतांना आदेशीत करावे अन्यथा महावितरण कंपनी व साखर कारखान्याच्या विरोधात लोकशाही मार्गने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा संजय पाटील दुधगांवकर यांनी दिला आहे. 

 
Top