धाराशिव (प्रतिनिधी)- पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ हे शिक्षक, प्राध्यापक व पदवीधरांच्या स्वतंत्र प्रश्नांना न्याय देण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत राजकीय पक्षांनी या मतदारसंघांवर आपले वर्चस्व निर्माण केल्याने मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पदवीधरांचा आणि शिक्षकांचा आमदार हा राजकीय पक्षाचा नव्हे, तर संघटनेचा असावा, असे प्रतिपादन मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. येत्या 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मराठवाडा शिक्षक संघासह विविध संघटनांनी सुशील सुरेशराव घोटे यांना उमेदवारी दिली आहे.

 
Top