धाराशिव/तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात अरुण प्रभाकर रोडगे यांच्या प्रवेशाच्या प्रकरणावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चर्चेत आला आहे. या प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, ‌‘मला नोटीस काढणेच चुकीचे आहे,' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत बोलताना विनोद गंगणे म्हणाले की, “मी कोणालाही गाभाऱ्यात सोडा, असे सांगितलेले नाही. संबंधित व्यक्ती गाभाऱ्यात जात असताना त्याला अडवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची होती? त्याला अडवले का नाही? मी त्याला आत सोडण्यास सांगितले होते का? या बाबींची चौकशी न करता मला नोटीस बजावणे चुकीचे आहे.”

या प्रकरणात संबंधित व्यक्तीला गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून रोखण्याची जबाबदारी कोणाची होती. तसेच प्रवेशावेळी नेमके काय घडले, याबाबत प्रश्न उपस्थित करत गंगणे यांनी नोटीस देण्याच्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणात मंदिर प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार आणि चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 
Top