धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडगाव (सि.) येथील रहिवाशी तथा धाराशिव पंचायत समिती उपसभापती प्रमोद पाटील यांच्या मातोश्री कस्तुरबाई (काकी) भाऊसाहेब पाटील (80) यांचे रविवार, 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता उपचारादरम्यान धाराशिव येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 10 च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.
कस्तुरबाई पाटील या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वडगाव (सि) येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी सकाळी 10च्या दरम्यान सिद्धेश्वर मंदिरासमोरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्र परिवार, गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा, नातेवंडे असा परिवार आहे.
