मुरूम (प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून नळदुर्ग व मुरूम ब्रँचच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील अंबाबाई मंदिराच्या सभागृहात संत निरंकारी सेवादल प्रशिक्षण शिबिर शुक्रवारी (ता. 2) रोजी उत्साहात पार पडले. या शिबिरात संत निरंकारी मिशनच्या शिकवणीनुसार शिस्त, सेवा आणि सहकार्याचे धडे देण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवार हे होते. यावेळी वस्त्र मंत्रालयातील सेवानिवृत्त प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. शिवाजी शिंदे, मुरूम रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, येळीचे प्रबंधक हरिकिशन पवार, सामाजिक कार्यकर्ते धनराज शिंदे, बलसुरचे प्रबंधक युवराज बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या विशेष सोहळ्यात मुरूम ब्रँचला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'दशकपूर्ती सोहळा' उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, मुरूमच्या मीरा मोटे व सेवादल सार्थक बोडरे यांचा वाढदिवस यावेळी केक कापून व सत्कार करून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त मीरा मोटे यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवंगत सिद्राम गंगाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ शिंदे परिवाराकडूनकार्यक्रमादरम्यान संत निरंकारी सेवादलाच्या माता-बहिनजींना मान्यवरांच्या हस्ते उपयोगी बॅगांचे वाटप करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षणात क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवार यांनी संत निरंकारी मिशनचे नियम, व्यवस्थापन, नियोजन, शिस्त, अटी आणि निस्वार्थी सेवेबद्दल सेवादल महापुरुष व बहिनजींना सखोल मार्गदर्शन केले. नळदुर्गचे सेवादल इन्चार्ज रोहित विभुते, मुरूमचे सेवादल इन्चार्ज बिरू बंदीछोडे, अभिजीत रुपनर, अभिषेक चव्हाण, वासू पवार, शिवानंद बिराजदार, दत्तात्रेय बोडरे, प्रमोद नारायणकर, ज्ञानेश्वर काळे, सुरेखा कांबळे, उषा साखरे, कमल शेवाळे, सुनीता व्हटकर, अनुसया नारायणकर, वैभव कटके आदींनी पुढाकार घेतला. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी विचारांचा व सेवादलाच्या कार्याचा बाळासाहेब पवार, डॉ. शिवाजीराव शिंदे, डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाढदिवसानिमित्त मीरा मोटे यांनी मनोगतातून भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरूम ब्रँचचे मुखी दयानंद साखरे तर आभार नळदुर्ग ब्रँचचे मुखी सुनील पिसके यांनी मानले. या शिबिराला शेकडो सेवादल महापुरुष व बहिनजी उपस्थित होत्या.
