मुरुम (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील नाईचाकूर,बोरी,सावळसूर ता.उमरगा येथे दुष्काळग्रस्त भागाची विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शिवारात फिरून पिकांची अवस्था, पाण्याची उपलब्धता आणि दुष्काळामुळे बळीराजासमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा आढावा घेतला. पिकांचे झालेले नुकसान, पाण्याची टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच आगामी हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसमोरील अडचणी आमदार बसवराज पाटील यांनी जाणून घेतल्या. 

शेतकऱ्यांना पाणी, चारा आणि आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकरी एकटा नाही; त्याच्या प्रत्येक अडचणीत त्याच्या पाठीशी देवाभाऊंचे महायुती सरकार खंबीरपणे उभे असल्याचे सांगून बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पाटील म्हणाले.  यावेळी नाईचाकूर येथील विजयकुमार सोनवणे, केशवराव पवार, रावसाहेब पवार, भालचंद्र बिराजदार, बाळू मशाळ,ज्ञानेश्वर पाटील,शाम चिंचोळे,अविनाश सूर्यवंशी, गुंडू बिराजदार,संदीप पाटील,दिनकर सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 
Top