तुळजापूर (प्रतिनिधी)- पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने पिंपळे गुरव येथील विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेला सन 2025-26 चा स्व. आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार फेडरेशनच्या अध्यक्षा रेश्मा अनिल भोसले, उपाध्यक्ष शामराव हुलावळे व सेक्रेटरी संतोष भेगडे यांच्या हस्ते देण्यात आला हा पुरस्कार . संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार, उपाध्यक्ष सूर्यकांत कुरूलकर, खजिनदार सखाराम वालकोळी, संचालक बाळासाहेब धावणे व व्यवस्थापक युवराज नलवडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
विजयराज पतसंस्थेने 24 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून सभासदांना सातत्याने 13 टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. संस्थेला दरवर्षी लेखापरीक्षणात ‘अ' वर्ग प्राप्त झाला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, अंध, दिव्यांग सभासद आणि विविध सामाजिक संस्थांना देणगीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. “हा पुरस्कार विजयराज परिवाराच्या 24 वर्षांच्या प्रामाणिक व पारदर्शक कारभाराची पावती आहे. हा सन्मान संचालक मंडळ, कर्मचारी आणि विश्वास ठेवणाऱ्या हजारो सभासदांचा आहे. भविष्यातही सभासदहित आणि समाजसेवेची परंपरा कायम ठेवू,” असे अध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले.
