धाराशिव (प्रतिनिधी)-  तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरात जो काही प्रकार घडला आहे त्याबद्दल आपण जिल्हाधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. असा इशारा तुळजापूरचे आमदार तथा मंदिर समितीचे ट्रस्टी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे. 

एका मटका किंगला तुळजाभवानी मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश देवून दर्शन दिले. त्यामुळे भोपी पुजारी मंडळाने तक्रार केली होती. त्याबद्दल बोलताना आमदार पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील पिक विम्या बाबत सुनावणीच्या अनुषंगाने मी काल सकाळ पासून नवी दिल्लीत आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात काल गाभाऱ्यात जो प्रकार घडला आहे त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत आपण जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना सूचना दिल्या आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल.

 
Top