तेर(प्रतिनिधी)- सोपे कर्ज वाटते, पण तुमची माहिती आणि पैसे धोक्यात येऊ शकतात.
सावध रहा, सुरक्षित रहा असे आवाहन तेर येथे जनजागृती करताना ढोकी पोलिस स्टेशन अंतर्गत तेर दुरक्षेत्रचे बिट अंमलदार विलास माळी यांनी केले आहे.
खोटे कर्ज ॲप्स ही फसवणुकीची ॲप्स आहेत. ही ॲप्स जलद आणि सोपे कर्ज देण्याचे आमिष दाखवतात. त्यानंतर तुमच्या मोबाईलमधील वैयक्तिक माहिती (संपर्क, फोटो, संदेश इ.) गैरवापर करून तुम्हाला धमक्या देतात आणि पैशांची मागणी करतात.
काही मिनिटांत कर्ज देण्याचे आमिष
संपर्क, फोटो, गॅलरी आणि लोकेशनची अनावश्यक परवानगी मागणे.खूप जास्त व्याजदर आणि लपविलेले शुल्क.बनावट नावाने चालणारे ॲप किंवा कंपनी.अतिशय कमी परतफेड कालावधी (साधारणतः 7 दिवस).परतफेड न केल्यास धमक्या देणे व संपर्कातील व्यक्तींना संदेश पाठवणे. फसवणूक कशी होते?सोशल मीडिया, WhatsApp किंवा एसएमएस द्वारे सोपे कर्ज देण्याचे आमिष दाखवले जाते.बनावट ॲप डाउनलोड करून संपर्क, गॅलरी आणि संदेशांची परवानगी घेतली जाते. विश्वास मिळवण्यासाठी सुरुवातीला थोडी रक्कम कर्ज म्हणून दिली जाते.त्यानंतर मोठ्या रकमेची परतफेड करण्याची मागणी केली जाते. पैसे न भरल्यास फोन, संदेश आणि धमक्या दिल्या जातात.तुमचे फोटो, संपर्क आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून मित्र-परिवारालाही संदेश पाठवले
जातात.स्वतःचे संरक्षण कसे कराल?
अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्था RBI किंवा NBFC मान्यताप्राप्त आहे का, ते तपासा.अनोळखी लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करू नका.
अनावश्यक परवानग्या देऊ नका.ऑनलाइन पुनरावलोकने तपासा. जलद आणि सोप्या कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका.तुमची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.तुम्ही लक्ष्य झाल्यास काय कराल?
फसवणूक करणाऱ्यांशी तात्काळ सर्व संपर्क बंद करा.
कोणतेही पैसे पाठवू नका.
मोबाईलमधील ॲपची सर्व परवानगी काढून टाका.तुमच्या माहितीचा गैरवापर झाल्यास जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करा.स्क्रीनशॉट, कॉल लॉग आणि इतर पुरावे जतन करून ठेवा.सायबर गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी: 1930 mhcyber.gov.in. एकत्र येऊया, सायबर सुरक्षित महाराष्ट्र घडवूया असे आवाहन तेर दुरक्षेत्रचे बिट अंमलदार विलास माळी यांनी तेर येथे जनजागृती करताना केले.
