धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव येथे विभागीय स्तरावरील शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत आपल्या एकलव्य माध्यमिक आश्रम शाळा यमगरवाडी तालुका तुळजापूर येथील गुणवंत खेळाडू ओमकार गंदेवार याने उत्कृष्ट कामगिरी करत दोन क्रीडा प्रकारांत द्वितीय क्रमांक पटकावला. 400 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, 80 मीटर हर्डल्स (अडथळा शर्यत) द्वितीय क्रमांक या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर ओमकार गंदेवार याची आगामी राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ओमकारच्या या यशाबद्दल त्याचे व क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर, बालाजी क्षीरसागर, यशवंत निंबाळकर, यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष उद्धवजी काळे, कार्यवाह, विवेकजी अयाचीत, उपाध्यक्ष डॉ.अभयजी शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, अण्णासाहेब मगर, संतोष बनसोडे , बालाजी शिरसागर, निर्मलाताई हुग्गे, राजाभाऊ कुंभार, खंडू काळे , कोंडीबा देवकर, शालीवाहन वाघमोडे, दत्ता भोजने यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
