भूम (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ‌‘अविष्कार' स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत शंकरराव पाटील महाविद्यालय, भूमच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी आकांक्षा थोरात हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर दिक्षा डोंबाळे हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अविष्कार मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनीचाही सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला.

या विद्यार्थिनींना प्रा. गोपाळ खंदारे आणि डॉ. शिवशरण माळी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अनुराधा जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष शिंदे, प्रा. डॉ. तानाजी बोराडे, प्रा. डॉ. नितीन पडवळ, आयक्युएसी समन्व्यक डॉ. गोकुळ सुरवसे, प्रा.पूनम सुतार, प्रा. डॉ. मंगेश खराटे, प्रा. अमोल कुटे, प्रा. डॉ. नंदू जगदाळे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींच्या या यशामुळे शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानाला नवी दिशा मिळाली असून, महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.


 
Top