धाराशिव (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड.पूजा देडे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. 

ॲड. पूजा देडे यांनी कायदे, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत राहून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. समाजातील वंचित व दुर्बल घटकांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, समान संधी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने सामाजिक भूमिका मांडली आहे.

राजकीय क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधत स्थानिक व सामाजिक प्रश्नांना राजकीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या कार्याचा विचार करून लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू भाऊ कसबे आणि प्रदेश अध्यक्ष श्री कैलास खंदारे यांनी त्यांची बिनविरोध निवड केली.

याबद्दल  प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे, प्रा. सुनिल मोहिते, प्रा.अर्चना मोहिते, प्रा.डॉ.सहदेव रसाळ, प्रा.डॉ.सहदेव रसाळ, श्री लक्ष्मण देडे इ.हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार बद्दल ॲड पूजा देडे यांनी सर्वांचे आभार मानले.आणि या पदाचा समाजकार्यासाठी पुरेपूर वापर करणार असल्याचे मत व्यक्त केले.

 
Top