तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांच्या सेवेसाठी  महावीर लोध धर्मशाळा, तुळजापूर यांच्या वतीने रामदिन परिवाराने तुळजापूरनळदुर्ग राज्यमार्गावरील देवसिंगा (तूळ) येथे सलग चार दिवस अन्नदानाचा उपक्रम राबविला.

नवरात्रोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुळजापुरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या या भाविकांना अन्नदानाच्या माध्यमातून सेवा देत रामदिन परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाचा सुमारे हजारो5 हजार भाविकांनी लाभ घेतला. या अन्नदान उपक्रमावेळी महावीर लोध धर्मशाळेचे मालक रामदिन जगदीश सिंग, रामदिन रवी सिंग आणि व्यवस्थापक दत्ता राठोड उपस्थित होते. नवरात्रोत्सवाच्या धावपळीत भाविकांना अन्नदानाच्या माध्यमातून दिलासा देणारा हा उपक्रम भाविकसेवेचा आदर्श ठरला.

 
Top