तुळजापूर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र महोत्सवात आज रविवार, सप्तमीच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षणासाठी श्री तुळजाभवानी देवींने भवानी तलवार दिली. त्या तलवारीच्या आर्शीर्वादाने स्वराज्याची स्थापना शक्य झाली, अशी लोक धारणा आहे. हाच परंपरेचा वारसा जपण्यासाठी दरवर्षी नवरात्रोत्सवात भवानी तलवार अलंकार महापूजा मांडली जाते.
दरम्यान, काल शनिवारी रात्री श्री तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक मोर या वाहनातून काढण्यात आली. यावेळी सोलापूर मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी, सेवेकरी व भाविक उपस्थित होते

