तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयासमोर स्वच्छता करत असताना स्वच्छता कर्मचारी दयानंद नीलकंठ कोळी यांना सुमारे दीड तोळे वजनाची सोन्याची अंगठी आढळून आली. त्यांनी ती अंगठी संबंधित भाविकाची खात्री करून त्यांना परत केली.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयासमोरील अग्निशमन दलाच्या वाहनाच्या मागील बाजूस स्वच्छता करत असताना दयानंद कोळी यांना ही अंगठी सापडली होती.