तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या अश्विनी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी पायी वारी करत तुळजापूरकडे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ ग्रामस्थांच्या वतीने अन्नदान सेवा सुरू करण्यात आली आहे. तुळजापूर ते अक्कलकोट रस्त्यावरील मंगरूळ गावात ही सेवा राबविण्यात येत असून, गेल्या 30 वर्षांपासून ग्रामस्थांकडून हा सेवाभावी उपक्रम अखंडपणे सुरू आहे.
