धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये ‘सुदृढ बालक, सशक्त भारत' या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम 2026 द्वारा महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग धाराशिव यांच्या वतीने माध्यमातून श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी चे मॅनेजर डॉ. पंकज शिंगारे, डॉ. सूरज रणशूर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते ज्योतीराम ओव्हाळ, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रमिला काशीद, औषध निर्माण अधिकारी श्रीमती वंदना राऊत, परिचारिका सौ. मनिषा पवार यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. या आरोग्य विद्यार्थी आरोग्य तपासणीसाठी मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे , उपप्राचार्य संतोष घार्गे , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , सर्व पर्यवेक्षक केशव पाटील ,कुमार निकम , बालाजी गोरे, राजेंद्र जाधव, शरद क्षिरसागर, सौ.बी.बी. गुंड,शेषनाथ वाघ, शिक्षक प्रतिनिधी महेश पाटील आदि शिक्षकशिक्षिका , सेवक यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे व नेत्र ,हृदय अन्य व्याधी समस्यांचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार मिळावेत हि या आरोग्य तपासणीचा उद्देश होय.
