धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या वर्षी याच शेतात 50 टन ऊस झाला होता.यंदा मात्र पावसाने दगा दिल्यामुळे पाच टनही ऊस होण्याची शक्यता नाही. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक डोळ्यांदेखत वाळत आहे... अशा शब्दांत ऊस उत्पादक शेतकरी नरेंद्र वीर यांनी आपल्या पीक नुकसानीची व्यथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासमोर मांडली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज,17 ऑक्टोबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी धाराशिव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी नरेंद्र वीर यांच्या शेताला भेट दिली.यावेळी त्यांनी पावसाअभावी नुकसान झालेल्या ऊस पिकाची पाहणी करून संबंधित शेतकऱ्याशी तसेच गावातील अन्य शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र वीर यांनी आपल्या शेतातील ऊस उत्पादनाची गेल्या वर्षीची आणि यंदाची परिस्थिती केंद्रीय राज्यमंत्र्यांसमोर मांडली.मागील वर्षी याच शेतातून 50 टन ऊस उत्पादन मिळाले होते.मात्र,यावर्षी पावसाअभावी ऊस पिकाची वाढ खुंटली असून,पाच टनदेखील उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य मोबदला मिळावा,यासाठी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळाला पाहिजे,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी उपस्थित अन्य शेतकऱ्यांनीही आपल्या अडचणी केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्यासमोर मांडल्या.
पावसाअभावी केवळ ऊस पिकाचेच नव्हे,तर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून,आता जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न उभा राहत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतातील उभी पिके पाण्याअभावी वाळत असताना दुसरीकडे पशुधनासाठी चारा कसा उपलब्ध करायचा,अशी दुहेरी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतीबरोबरच पशुधनाच्या संगोपनाचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होत असल्याची व्यथा उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली. पावसाअभावी केवळ ऊस पिकाचेच नव्हे, तर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून,आता जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न उभा राहत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतातील उभी पिके पाण्याअभावी वाळत असताना दुसरीकडे पशुधनासाठी चारा कसा उपलब्ध करायचा,अशी दुहेरी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.शेतीबरोबरच पशुधनाच्या संगोपनाचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होत असल्याची व्यथा उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शेतात प्रत्यक्ष जाऊन ऊस पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती, पावसाअभावी झालेले नुकसान आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती जाणून घेतली.शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीतील नुकसानीची वस्तुस्थिती आणि चारा टंचाईमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने दुष्काळसदृश परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या शेती आणि पशुधनाच्या प्रश्नांना शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांसमोर प्रत्यक्ष वाचा फोडली.
