धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेच्या अनुषंगाने तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांची जिल्हास्तरीय (दि.24)आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस काँग्रेसचे  प्रभारी भरतसिंह सोलंकी यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष उमेश इंदसिंह राजेनिंबाळकर यांनी सोलंकी यांचे स्वागत केले.

बैठकीत जिल्ह्यातील सर्व बूथची माहिती घेण्यात आली. -1 व -2 यांच्या प्रशिक्षणाची स्थिती, मतदार यादीची पडताळणी, पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट असल्याची खात्री तसेच बूथ लेव्हल एजंट्सच्या अधिकार व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक बूथवर मतदार यादी काळजीपूर्वक तपासून पात्र मतदारांचे मतदानाचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सजगपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना भरतसिंह सोलंकी म्हणाले, “लोकशाहीच्या रक्षणासाठी निष्पक्ष निवडणुका आणि मतदार यादीची पडताळणी महत्त्वाची आहे.” मतदार यादीतील बदलांबाबत काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांचा संदर्भ देत त्यांनी बूथ पातळीवर कार्यकर्त्यांनी दक्षतेने काम करण्याचे आवाहन केले. या बैठकीमध्ये पदाधिकारी यांच्याकडून केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

काँग्रेसच्या ‌‘मत वाचवा, देश वाचवा' अभियानाचाही बैठकीत उल्लेख करण्यात आला. या अभियानांतर्गत 1 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मतदार यादीचे पुनरीक्षण ही प्रत्येक पात्र नागरिकाचा लोकशाहीतील सहभाग सुनिश्चित करणारी महत्त्वाची प्रक्रिया असून, या प्रक्रियेत बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

यावेळी प्रदेश सचिव डॉ. दिनेश नवगिरे, विश्वास आप्पा शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष धीरज देशमुख, राजेंद्र शेरखाने, प्रशांत पाटील, खलील सय्यद, एस. पी. इनामदार, विलास शाळू, अर्जुन बिराजदार, सिराज मोगल, दयानंद पाटील, विनोद वीर, शिवाजी गायकवाड, शिवानंद तोडकर, गोरोबा झेंडे, ॲड. जावेद काझी, महेबुब पटेल, धनंजय राऊत, पृथ्वीराज देशमुख, मनीषा वाघमारे, अग्निवेश शिंदे, सरफराज काजी, वसंत मडके, अंकुश पेठे, विजय मुद्दे, प्रीतम शिंदे, मोइज सय्यद, हरिदास शिंदे, मौलाना शौकत, भैय्या निरफळ, संकेत पडवळ, बालाजी राठोड, संजय गजधने, दिगंबर गायकवाड, कृपालसिंह ठाकुर, विष्णू पेठे, ॲड. राजुदास आडे, शिलानंद शिंगारे, इमाम शेख, प्रेमानंद सपकाळ, दयानंद नागपुरे, आरिफ मुलानी यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष,  व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.


 
Top