उस्मानाबाद/प्रतिनिधी-
वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने त्यावर मात करण्यासाठी अतुल लुगडे व त्यांच्या सहका-यांनी एकाच दिवशी ११५ शोषखड्डे खोदुन पडणा-या पावसाचे व साडपाण्याचे पाणी मुरविण्याचे काम केले आहे. या गावास जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी भेट देऊन या गावचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन केले आहे.
वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथील ४० बोअर पैकी फक्त तीनच बोअर चालू होते.गावात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई जाणून गावातील ग्रामस्थांनी एकत्र बसून यावर उपाय-योजना करण्यासाठी राज्य सरकारच्या योजनेतून शोष खड्डे घेण्याचे ठरविले. या कामी त्यांना सामाजिक कार्यकर्ते बालाजी पवार यांनी मार्गदर्शन केले. बालाजी पवार यांनी गावात येऊन गावातील लोंकांना दुष्काळावर मात करण्यासाठी पैसा व पाणी याची बचत करण्यासाठी शोषखड्डयाचे महत्व सांगितले. यावेळी अतुल लुगडे व ग्रामस्थ गंगाराम शिंदे, संभाजी सावंत, अतुल वाघमारे, सुधीर माने, ग्रामसेवक बोरारी टी.एस. यांनी परिश्रम घेतले.