भूम (प्रतिनिधी)- भूम तालुका भाजप कामगार आघाडी अध्यक्षपदी विनोद रोहिदास थोरात यांची निवड करण्यात आली . निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमातून देण्यात आले .
शुक्रवार दिनांक 23 -10 - 2026 रोजी भाजप तालुका कार्यालयात तालुक्यातील असंख्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . यावेळी तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती . प्रसंगी भाजप कामगार आघाडी तालुका अध्यक्षपदी विनोद रोहिदास थोरात राहणार ईडा यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी उद्योग आघाडीचे नेते बापू बगाडे, प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, समाधान अंधारे , आसिफभाई मुकेबील, प्रशांत किरमे, समाधान पिंगळे, आबासाहेब रावसाहेब गोरे, जायभाय महादेव यादव, बाळू वारे , संजय थोरात, नंदकुमार खैरे, भाऊसाहेब थोरात , किरण घाडगे, भारत वाघमारे, शिवाजी जाधव आदींची उपस्थिती होती.
