तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील शिव नृसिंह नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. देवीच्या आरतीनंतर गरजू व शाळकरी मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिव नृसिंह नवरात्र उत्सव मंडळ दरवर्षी केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम मंडळाकडून राबविले जातात. यंदा नवरात्र उत्सवात देवीची विधिवत पूजा व आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मंडाळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी शालेय मुलींना मंडळाकडून शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि मुलींनी शिक्षणात पुढे यावे या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमांसाठी शिव नृसिंह नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्ते व महिलांनी परिश्रम घेतले.
