तेर (प्रतिनिधी)- आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्याच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

धाराशिव येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक व सोशल मीडिया क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पळसप येथील अविनाश भोसले यांना ‌‘संघर्ष योद्धा समाज रत्न पुरस्कार 2026' प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार सुजितसिंहजी ठाकूर, आमदार सुनील कांबळे आणि आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा नगीनाताई कांबळे यांच्या हस्ते अविनाश भोसले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सामाजिक कार्यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, जनहिताचे विषय आणि सकारात्मक विचार प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. यावेळी अविनाश भोसले म्हणाले की, “हा पुरस्कार माझ्या केलेल्या कार्याच्या कौतुकाची थाप आहे. मात्र या सन्मानाने हुरळून न जाता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे, याची जाणीव झाली आहे. ही जाणीव ठेवून यापुढेही सामाजिक व सोशल मीडिया क्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न राहील.”या पुरस्कार सोहळ्यामुळे सामाजिक, कृषी, कला, वाणिज्य, राजकारण, शिक्षण, क्रीडा व सेवा आदी विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

 
Top