धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर अंतर्गत विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर येथे अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा शैक्षणिक वर्ष 2026 - 27 चे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धांमध्ये 4-100 रिले महिला स्पर्धेत लोमटे ऋतुजा बालाजी प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त झाले.या स्पर्धेत भोंग मेघा हनुमंत, चव्हाण अंकीता सुभाष, रिटे दिक्षीत रवींद्र,आगळे रुपा नवनाथ यांनी ही सहभाग घेतला होता.लांब उडी मध्ये विशाल जाधव याने द्वितीय येऊन रौप्यपदक पटकावले तर 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कु ऋतुजा बालाजी लोमटे हिने तृतीय क्रमांकाने कांस्यपदक पटकावले.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए के मंजुळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाप्रसंगी प्रभारी जिमखाना विभाग प्रमुख डॉ विकास सरनाईक यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्राप्त यशाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.


 
Top