तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील 60 विद्यार्थ्यांनी ‌‘कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम' या उपक्रमांतर्गत विविध विषयांवर मार्गदर्शन करून जनजागृती केली.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी संबंधित विषयांचे महत्त्व, त्यांचे फायदे व तोटे याबाबत नागरिकांना माहिती दिली. समाजाशी संवाद साधत विविध विषयांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.

या वेळी विभागप्रमुख प्रा. डी. डी. पंतंगे, प्रा. पी. टी. सूर्यवंशी, प्रा. एन. आर. चव्हाण, प्रा. एस. एल. बुरगे यांच्यासह कृष्णा प्रभागातील संबंधित व्यक्ती उपस्थित होत्या.या उपक्रमासाठी कुलस्वामिनी महाविद्यालयाचे प्राचार्य एन. डी. पिसे, सहशिक्षक आर. आर. ससाणे, डी. डी. भालेराव आणि शेळके मॅडम यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक जाणीव आणि जनजागृती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.


 
Top