तुळजापूर (प्रतिनिधी)-  पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतापसिंह पाटील  हे निवडून आल्याचे जाहीर होतात  तीर्थक्षेत्र तुळजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. श्री तुळजाभवानी मंदिरासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी सर्वप्रथम फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर चोपदार यांच्या वतीने बालकांसह शहरवासीयांना 51 किलो पेढ्यांचे वाटप करण्यात आले. या आनंदोत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर चोपदार, शेखर कदम, मनोज नागेश शेटे, राकेश चोपदार, राम नेपते, आकाश नेपते, राणा चोपदार, गणेश ननवरे, मनोज देडे, ओंकार चोपदार, सुनील घोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतापसिंह पाटील यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी एकत्र येत उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.


 
Top