तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे पुरातत्व विभाग प्रमुख प्रा.प्रभाकर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्व विभागाच्या विद्यार्थी,विद्यार्थीनी यानी विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
तेर येथील श्री त्रिविक्रम मंदिर,तेर येथील पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खनन केलेले ठिकाणे, श्री.संत गोरोबा काका यांचे रहाते घर,कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयातील पुरातन वस्तूची पहाणी केली.
